एक वर्षी गावात दुष्काळ पडला होता. गावातील सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण होते. गावातील मध्यभागी असणाऱ्या वडाच्या झाडाखाली पारावर काही गावकरी मंडळी गप्पा मारत होते. सर्व एकमेकांना म्हणत असायचे की यावर्षी धान्य काय एवढं झाले नाही. शेतीतून काही उत्पन्नच मिळालेली नाही.एक वर्षी गावात दुष्काळ पडला होता. गावातील सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण होते. गावातील मध्यभागी असणाऱ्या वडाच्या झाडाखाली पारावर काही गावकरी मंडळी गप्पा मारत होते. सर्व एकमेकांना म्हणत असायचे की यावर्षी धान्य काय एवढं झाले नाही. शेतीतून काही उत्पन्नच मिळालेली नाही.
अशी चर्चा ती एकमेकांसोबत करत होते तेवढ्यात एक जण पेपर वाचत असताना त्यांना म्हणाला की भाऊ पुढील आठवड्यात पाऊस सांगितला आहे आणि हा पाऊस खूपच जोरदार सांगितलेला आहे त्यामुळे लोकांच्या चर्चेला आणखी एक विषय मिळाला आता पाऊस सांगितला म्हटल्यावर गावातील लोकांना थोडीशी अशा वाटू लागली.

तेवढ्यात दुसरा म्हणाला की मागच्या आठवड्यात देखील असाच जोरदार पाऊस सांगितला होता पण पावसाचा थेंब काय ढग सुद्धा आलेला आहे. हे ऐकताच निराशा देखील झाली. आणि म्हणाले की यावर्षी पाऊसच नाही दुष्काळ पडणार आहे. आणि त्यांच्यातीलच एक म्हणाला पडला तर पडला दुष्काळ आपण डबा घ्यायचा आणि कुठेतरी बाहेरगावी कामाला जायचं आणि कसेतरी दिवस काढायचे हे बोलणे सोपे आहे पण करणार कितीतरी कठीण.
पेपर वाचत असणाऱ्या व्यक्तींना दुष्काळ पडला तर सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीतरी देईल कारण काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर सरकारी भरपाई देतच असते याआधी दिलेली असते आणि पुढेही देईल. त्यावर एक जण म्हणाला सरकार तरी कोणा कोणाला पैसे देईल आता मोठ्या प्रमाणात शेतकरी झाले आहेत. त्यामुळे सरकार तरी कोणा कोणाला पैसे दिले पूर्वीच्या काळी शेतकरी कमी असायचे तेव्हा त्यांना मदत मिळायची. आताचे सरकार थोडीफार मदत करेल पण बाकीचं शेतकऱ्यांनाच करावे लागेल.

तर याच विषयावर पूर्वीच्या काळातील दुष्काळाने आजच्या काळातील दुष्काळ यामध्ये काय फरक आहे हे पाहुया.
पूर्वी दुष्काळाची परिस्थिती कशी असायची.
पूर्वी दुष्काळ पडला तर अन्नधान्याचा तुटवडा पडायचा जनावरांचा चारा नसायचा आणि पाणी देखील नसायचे.
पूर्वी दुष्काळामुळे स्थलांतर देखील व्हायचे पण कमी प्रमाणात सरकार रस्त्याचे तळ्यांचे काम काढायचे आणि ग्रामीण भागातील लोकांना काम मिळायचे अन्नधान्यांचा तुटवडा तर पडायचा पण अन्नधान्य हे बाहेरील देशातून आयात करावी लागत असायचे त्यामुळे उपासमार देखील मोठ्या प्रमाणात व्हायची
भर उन्हात तळ्यांचे काम करायचे लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे लोक देखील हे काम करायचे उपासमार यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल व्हायचे. आणि आजच्या काळात देखील परिस्थिती एवढी काही बदललेली नाही आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बघितलं तर पूर्वीच्या काळासारखेच परिस्थिती आहे. एवढे तंत्रज्ञान आलेले असून देखील परिस्थिती काही बदललेली नाही.
यावर्षी देखील राज्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा होईल. लोकांच्या हाताला काम नसल्याने लोक बाहेरगावी कामं शोधत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत आजही खेडेगावात जाऊन पाहिलं तर काही वयस्कर माणसेच गावात दिसतात नाहीतर गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आत्ताच दिसून येत आहे.
त्यामुळे एवढे तंत्रज्ञान असून देखील पूर्वीपेक्षा यावर्षी दुष्काळाची परिस्थिती भयंकर आहे.