Slurry Beneficial for Crops, शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी जर काय असेल? तर ती असते, शेतातील पिकासाठी खरेदी केलेली खते आणि औषधे. पण ही खते आणि औषधे आपल्या पिकासाठी किती फायदेशीर आहेत? किंवा आपण ज्या मातीमध्ये हे खते औषधे टाकतोय हे किती प्रमाणात मातीसाठी देखील फायदेशीर आहे? का हानिकारक आहे? हे शेतकऱ्यांना समजत नाही. काही शेतकऱ्यांना समजतंय की काही खते औषधे ही मातीसाठी हानिकारक आहेत, तरीदेखील नाईलाजाने त्यांना ती कधी वापरावी लागतात. हे एका बाजूने खरे आहे. पण दुसरी बाजू देखील आपण पाहिली तर आपण जैविक पद्धतीचे देखील वापर करू शकतो, जेणेकरून जे आपली गोठ्यातील शेण गोमूत्र हे देखील शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याच विषयी आणि इतर काही गोष्टी वापरून आपण एक पिकासाठी आणि आपल्या मातीसाठी देखील उपयुक्त असणारी स्लरी कशी बनवायची? आणि त्याचे फायदे काय आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे. शेती समृद्धी-शेती योजना या ग्रुप मध्ये जॉइन व्हा
स्लरी म्हणजे काय.
बऱ्याचशा शेतकऱ्यांना स्लरी विषयी माहिती आहे ते शेतकरी स्लरीचा उपयोग देखील करत आहे पण योग्य पद्धतीने स्लरी कशी बनवली जाते हे बरेचसे शेतकऱ्यांना अजून देखील माहित नाही.
स्लरी म्हणजे आपण घरच्या घरी आपल्या गोठ्यातील गावठी किंवा जर्सी गाईचे शेण आणि गोमूत्र (गावठी असेल तर सर्वोत्तम)
यांना 200 लिटरच्या बॅरेल मध्ये 15 ते 20 दिवस हवा बंद ठिकाणी ठेवल्यास जे लिक्विड तयार होते त्याला स्लरी म्हणतात स्लरी साठी अजून काही पदार्थ मिक्स केले जातात ते देखील पुढील प्रमाणे आहे. Slurry Beneficial for Crops
शेतकऱ्यांनी स्लरी का वापरावी.
शेतकऱ्यांसाठी स्लरीचे महत्त्व खूप आहे. स्लरी शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण खता औषधांसाठी अमाप खर्च करावा लागत नाही. त्यासोबत जमिनीची हानी देखील होत नाही, कमी खर्चात घरीच स्लरी तयार होते. आणि शेतकऱ्यांना त्या स्लरीचा रिझल्ट देखील भेटतो.
ज्यावेळेस आपण 15 ते 20 दिवसानंतर तयार झालेली स्लरी पिकांना देतो, त्यावेळेस पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रमाणात होते. झाडाच्या मुळाची वाढ होते. त्यामुळे जमिनीतील जे काही अन्नद्रव्य आहेत ते पिकाला चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यासोबतच जमिनीचा कस देखील वाढतो. स्लरी मुळे पिकाचा विकास तर होतोच त्यासोबतच जमिनीचा देखील विकास होतो.
Slurry Beneficial for Crops
ही स्लरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी.
स्लरी तयार करण्यासाठी 200 लिटर बॅरल मध्ये (200 लिटर पाण्याचे प्रमाण आहे.) दहा किलो शेण पाच ते सात लिटर गावठी गाईचे गोमूत्र तीन किलो बेसन पीठ तीन किलो काळा गूळ हे सर्व साहित्य 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या.
त्यानंतर चांगल्या फडक्याने बॅरलचे तोंड बांधा जेणेकरून हवा आत जाणार नाही.
आणि हे बॅरेल सावलीच्या ठिकाणी ठेवा. आणि दररोज दिवसातून दोन ते तीन वेळेस चांगले हलवून घ्या. असे पुढील पंधरा ते वीस दिवस करा त्यानंतर आपलं पीक किती दिवसांच्या आहे त्याप्रमाणे थोडी थोडी स्लरी ड्रीप वाटे पिकाला द्या.
एक महत्त्वाची काळजी घ्या ज्यावेळेस शेण आपण त्यामध्ये टाकतो तसेच ते पिकाला ड्रिप वाटे देऊ नका आधी व्यवस्थित गाळून घ्या आणि मगच ड्रीप वाटे सोडा. जेणेकरून जी घाण असते ती ड्रीप मध्ये अडकणार नाही.
स्लरी वापरण्याची योग्य पद्धत.
आधी सांगितल्याप्रमाणे स्लरीही ठिबक द्वारे देता येते. पण व्यवस्थित गाळून घेतली असेल तरच, त्यानंतर स्लरी बऱ्याचशा पिकांना देता येते, तसं पाहिलं तर सर्वच पिकांना जसे की, डाळिंब, टोमॅटो, कांदा, मिरची, कोणतीही फळबाग किंवा इतर काही पिके सर्व पिकांना ही स्लरी वापरता येते आणि या पिकांसाठी स्लरी ही अतिशय उपयुक्त आहे.
उदा. टोमॅटो साठी स्लरी वापरली तर टोमॅटोचे झाड अतिशय सुंदर प्रकारे वाढते त्यासोबत फुलांचे प्रमाण वाढते तसेच फळाचे देखील साईज वाढते.