Dushkal 2026 जुना दुष्काळ आणि आज 2026 चा दुष्काळ यातील हे काही फरक सारखेच आहेत पहा.

जुना दुष्काळ आणि आज 2026 चा दुष्काळ यामध्ये एका नजरेत तुलना केली तर आज 2026 मध्ये जग हे खूप पुढे गेला आहे आधुनिक झाला आहे त्यामुळे दुष्काळा हा नसायला पाहिजे पण दुर्दैवाने भारत देशातील जनतेला दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागत आहे.
जर आपण जुना दुष्काळाने आजचा दुष्काळ जर तुला केली तर जुन्या काळात शेतीला जोडधंदा बहुतेकदा नसायचा परंतु आता शेतीला जोडधंदा आहे त्यासोबतच शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री देखील उपलब्ध आहे.
पूर्वीच्या काळी शेतीत बैलगाडीचा वापर हा मुख्य प्रमाणात केला जात होता पण आता ट्रॅक्टर आणि वाहने उपलब्ध आहेत जेणेकरून शेतीही अधिकच सोपी आणि सोयीस्कर बनलेली आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत त्या सुरूच आहेत.
एवढ्या आधुनिक युगात देखील दुष्काळ पहावयास मिळत आहे आणि सरकार फक्त मदतीच्या घोषणा करत आहे.

राज्यात काही भागांमध्ये शेतकरी समृद्ध झालेल्या दिसून येत आहे पण राज्याचा दुसऱ्या चित्र पाहिलं तर परिस्थिती जशी 1972 ला होती तसेच आता देखील आहे.
ज्या भागात धरणे तलाव आहेत त्या भागातील शेतकरी समृद्ध झाले आहे पण समृद्ध म्हणजे नक्की कसे तर पूर्वीच्या काळी शेतीला पाणी देण्यासाठी विहिरी मधून पाणी बाहेर काढून पाट पाण्याने शेती करावी लागत होती चित्र बदललेला आहे आता तुषार सिंचन ठिबक सिंचन या प्रकारचे पर्याय शेतकऱ्या जवळ उपलब्ध आहेत पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना विहीर काढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवावे लागत होते पण आता अशा काही मशिनरी यंत्रसामग्री उपलब्ध आहेत ज्याने काही दिवसांमध्येच विहीर तयार होते बोरवेल होतात.
पण एवढं सगळं असून देखील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या जरा सहन कराव्याच लागत आहेत.

WhatsApp Group Join Now

Dushkal 2026 जुना दुष्काळ आणि आज 2026 चा दुष्काळ यातील हे काही फरक सारखेच आहेत पहा.